चिंचकसाडमध्ये बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:57 PM2021-02-13T23:57:43+5:302021-02-14T00:27:03+5:30
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील चिंचकसाड येथील परिसरात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी व दोन बछडांनी बोकड, घोड्याचे शिंगरु, पाळीव कुत्री फस्त केले. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला करण्याच्या प्रयत्नात असताना या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने २० ते २५ शेतकऱ्यांनी हातात काठ्या घेऊन बिबट्याला उसाच्या शेतातून पळवून लावले.

येथील परिसरातील शेतकरी व शालेय विद्यार्थी भयभीत झाले असून घबराटीचे वातावरण आहे. तरी वनविभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येथील आदिवासी वस्ती जवळ जंगल असून जवळच गिरणा नदी आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्या पाणी पिण्यासाठी येतो. जवळच अनेक शेळ्या मेंढ्या व मेंढपाळाचा वाडा असल्याने बिबट्याचे शेतकऱ्यांना मुक्त दर्शन झाल्याने भयभीत झालेत. त्यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे.
परिसरात जवळपास जंगल असून गिरणा नदी आहे. अंधाराचा फायदा घेत बिबट्या शेतामध्ये मुक्त फिरत आहे, यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. माझ्या मागावर बिबट्या सुटला होता मात्र मी आरडा ओरड केल्याने शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने बिबट्याने पळ काढला व माझा जीव वाचला. आता तातडीने वन विभागाने लक्ष घालून परिसरात पिंजरा लावावा.
- देवीदास शिंदे, शेतकरी, चिंचकसाड.