नाशिकमध्ये फिरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद; रहिवाशांकडून सुटकेचा निःश्वास!

By अझहर शेख | Updated: August 1, 2023 15:06 IST2023-08-01T15:01:55+5:302023-08-01T15:06:38+5:30

गोदाकाठालगतच्या गंगापुररोडवरील आनंदवल्लीच्यापुढे बेंडकुळे नगरमध्ये मागील महिनाभरापासून बिबट्याचा संचार आढळून येत होता

Leopard roaming on Nashik's Gangapur Road finally caged; The residents breathed a sigh of relief! | नाशिकमध्ये फिरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद; रहिवाशांकडून सुटकेचा निःश्वास!

नाशिकमध्ये फिरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद; रहिवाशांकडून सुटकेचा निःश्वास!

नाशिक : गंगापुररोडवरील आनंदवल्लीच्या पुढे असलेल्या बेंडकुळे नगरमध्ये बिबट्याचा संचार असल्याच्या तक्रारी नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. यानुसार चार दिवसांपुर्वी याठिकाणी वनाधिकारी यांनी पाहणी करून पिंजरा तैनात केला होता. या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.१) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी दिली.

गोदाकाठालगतच्या गंगापुररोडवरील आनंदवल्लीच्यापुढे बेंडकुळे नगरमध्ये मागील महिनाभरापासून बिबट्याचा संचार आढळून येत होता. नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सातपुर वनपरिमंडळाच्या अखत्यारितित असलेल्या या भागात वनपरिमंडळ अधिकारी शैलेंद्र झुटे यांचे पथक बिबट्याचा माग काढत होते. आठवडाभपरापुर्वी याच भागातील एका उद्यानात बिबट्या रात्रीच्यावेळी फिरताना नागरिकांच्या नजरेस पडला होता. याबाबतची तक्रार वनखात्याला प्राप्त झाली होती. यानंतर २९जुलै रोजी येथील रहिवासी जितेंद्र रूईकर यांच्या फ्लॅट क्र.११७ असलेल्या सोसायटीजवळ वन कर्मचाऱ्यांकडून पिंजरा तैनात करण्यात आला. पिंजऱ्यात सावज म्हणून बोकड ठेवण्यात आले होते. मंगळवारी पहाटे या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. बिबट्याचे वय अंदाजे दीड वर्षे असून ती मादी असल्याची माहिती गाडे यांनी दिली. या बिबट्याने मोकाट श्वानांसह पाळीव श्वानांचा मागील महिन्यात फडशा पाडला होता. बिबट्याच्या मुक्त संचाराने बेंडकुळेनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने या भागातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Web Title: Leopard roaming on Nashik's Gangapur Road finally caged; The residents breathed a sigh of relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.