बिबट्याच्या अफवांचे सत्र शहरात कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:11 PM2020-06-14T18:11:38+5:302020-06-14T18:17:26+5:30
वनविभागाच्या पाहणीत बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले नाहीत. उपनगर हा परिसर अर्टिलरी सेंटरपासून जवळ असल्याने बिबट्याचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रविवारी बिबट्याचे ठसे दिसले नसले, तरी रात्रीच्या वेळी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन
नाशिक : मे महिन्यात इंदिरानगरच्या राजसारथी सोसायटीत बिबट्याने दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या दर्शनाच्या अफवा वाढत आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही वनविभागाला अफवा रोखण्यात यश आलेले नाही. बिबट्याच्या अफवांचे सत्र शहरात कायम असून, रविवारी पहाटे उपनगर परिसरातील इच्छामणी गणेश मंदिर भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा करण्यात आला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी 2 तास शोधमोहीम राबविली मात्र, बिबट्याच्या पाऊलखुणा कोठेही आढळल्या नाहीत. ज्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला, त्या ठिकाणी श्वानाच्या पायांचे ठसे असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
मे महिन्यात इंदिरानगरच्या राजसारथी सोसायटीत बिबट्याने दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या दर्शनाच्या अफवा वाढत आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही वनविभागाला अफवा रोखण्यात यश आलेले नाही. याचा प्रत्यय रविवारी (दि.१४) पहाटे उपनगर परिसरात आला. इच्छामणी गणेश मंदिर परिसरातील एका इमारतीत बिबट्या लपल्याची आवई उठली. परिसरातील वीस-पंचवीस युवकांनी बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा केला. त्यानुसार इच्छामणी गणेश मंदिर, कॅनलरोड, आम्रपाली झोपडपट्टी, बॉम्बे हाऊस, भूत बंगला, पोस्ट कार्यालय, बीएसएनल कार्यालय परिसरात दोन तास शोध घेण्यात आला.
-