बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 03:19 PM2018-11-27T15:19:16+5:302018-11-27T15:19:28+5:30
खामखेडा- देवळा तालुक्यातील खामखेडा येथील डोंगर व नदीकिनारी दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने शेतात वास्तव्य करून राहणाºया शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खामखेडा- देवळा तालुक्यातील खामखेडा येथील डोंगर व नदीकिनारी दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने शेतात वास्तव्य करून राहणाºया शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे. खामखेडा गावच्या उत्तर बाजूला लोहदर ते मोकभणगी असे डोंगर पर्वतांच्या रांगा असून या डोंगरात नेहमी बिबट्याचे वास्तव्य आहे. यामुळे अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होते. हे वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने हे प्राणी अन्न व पाण्याचा शोधार्थ मानवी वस्तीकडे येतात. एक महिन्यापासून मांगबारी परिसरात मळ्यामघ्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक प्राणी आपले भक्ष केले आहे. गेल्या एक महिन्यांपूर्वी तिळवण किल्याच्या पायथ्याशी फांगदर आदिवासी लोक वास्तव्य करून राहतात.ते मजुरी करून आपले पोट भागवितात. तेव्हा त्यांनी मजुरीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन, गायी पाळल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सायंकाळी अंधार पडत नाही तो बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शेतकरी वर्गाकडे सांगण्यात येत आहे.