Video: नाशिक सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 09:54 AM2022-06-17T09:54:07+5:302022-06-17T09:54:22+5:30
वनखात्याने या परिसरात पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
नाशिक- गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात बिबट्याचा वावर सुरू असून त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलकमल मार्बलच्या परिसरात बिबट्या येऊन गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या कंपनीचे संचालक महेंद्र छोरीया यांनी या संदर्भात माहिती दिली दोन दिवसांपूर्वी महात्मा नगर जवळील लवाटेनगर परिसरात बिबट्या अशाच प्रकारे दिसल्याने एका प्रवाशाने मोबाईल मध्ये चित्रीकरण करून व्हिडिओ वन खात्याला पाठवला होता. त्यानंतर वनखात्याने परिसरात कसून शोध घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्या आढळल्याने कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने या परिसरात पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
नाशिक- गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात बिबट्याचा वावर सुरू असून त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलकमल मार्बलच्या परिसरात बिबट्या येऊन गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. pic.twitter.com/OPhAOU1gJs
— Lokmat (@lokmat) June 17, 2022