लोणजाई डोंगराच्या कपारीत बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:42 PM2021-01-27T23:42:42+5:302021-01-28T00:41:16+5:30
निफाड : तालुक्यातील लोणजाई डोंगराच्या मागच्या बाजूकडे आंबेवाडी आणि सोनेवाडी शिवारात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, याठिकाणी वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.

लोणजाई डोंगराच्या कपारीमध्ये दिवसा बिबट्याने दर्शन दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना ही बाब सांगितल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांनी सदर घटना वनविभागाला कळविल्यानंतर मनमाडचे वनपाल भगवान जाधव, वनरक्षक सुनील महाले, वनसेवक भय्या शेख आदींचे पथक या ठिकाणी पोहचले. दिवसभर बिबट्या कपारीत बसून होता. रात्रीच्या वेळी बिबट्या येथून निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वनविभागाने या परिसरात गोविंद एकनाथ माळी यांच्या शेताजवळ बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.