दोन बछड्यांसह बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:23 AM2020-12-05T04:23:17+5:302020-12-05T04:23:17+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ओझे परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास तुळशीराम गोजरे यांच्या वस्तीजवळ द्राक्षबागेच्या शेजारील मोकळ्या शेतामध्ये ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ओझे परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास तुळशीराम गोजरे यांच्या वस्तीजवळ द्राक्षबागेच्या शेजारील मोकळ्या शेतामध्ये बिबट्याच्या मादीसह बछडे खेळताना दिसून आल्याने घबराट पसरली आहे.
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुळशीराम गोजरे यांचा मुलगा संदीप हा द्राक्षबागेला ट्रॅक्टरने फवारणी करत असताना हा प्रकार लक्षात आला. बिबट्या मादी जोरात गुरगुरत असल्याचे पाहून संदीपने घराकडे पळ काढला. शेजारी कादवा नदी व मोठ्या प्रमाणात लपण्यासाठी जागा असल्यामुळे या ठिकाणी बिबट्यांचा कायम संचार असतो. यापूर्वीही गोजरे त्यांच्या वस्तीवर अनेकवेळा बिबटे आले आहेत.
ओझे परिसरामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात चार दिवस रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कृषिपंपांना थ्री फेज वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात जावे लागते. त्यामुळे एकीकडे रात्रीचा वीजपुरवठा तर दुसरीकडे रात्री बिबट्यांची दहशत यामुळे शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. या परिसरामध्ये पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
===Photopath===
041220\04nsk_35_04122020_13.jpg
===Caption===
बिबट्या