साकोरेतील नागरिकांना बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:59 PM2020-07-21T21:59:10+5:302020-07-22T00:58:11+5:30
ओझर : येथून जवळच असलेल्या साकोरे मिग गावातील नागरिक सध्या बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ओझर : येथून जवळच असलेल्या साकोरे मिग गावातील नागरिक सध्या बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
निफाड तालुक्यातील सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणाऱ्या साकोरे मिग गावाची लोकसंख्या चार हजाराच्या आसपास असून, गावाला लागून एचएएलचे कंपाउण्ड आहे. त्यात एचएएलची शेकडो एकर जागा पडित असून, त्यात अनेक हिंसक जनावरांचे वास्तव्य आहे. जनावरांच्या सीमा या कंपाउण्डच्या आत असताना त्याला आता सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या अंगणात जागा मिळू लागली आहे. त्याचा सर्वाधिक फटका साकोºयाच्या ग्रामस्थांना बसत आहे. बिबटे, रानडुकरे हे आता एचएएलच्या भिंतीवरून उड्या घेत थेट गावात शिरत आहे. शिवारात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरू केले आहे. वनविभागाने पिंजरे लावून उपाययोजना केली असली तरी बिबट्याचा बंदोबस्त झालेला नाही. लावलेल्या पिंजºयाशेजारून बिबट्या गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून निष्पन्न झाल्याने नागरिकांचे आता घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसले आहे.
निफाड तालुक्यात गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी, करंजगावसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी, मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. ऊस शेतीमुळे बिबट्या केव्हा हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने गावापासून दूर अशा मळ्यांमध्ये वस्ती करून राहणाºया शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे बसवावे, अशी मागणी गोदाकाठ परिसरातील शेतकºयांकडून होत आहे.
------------------
एचएएलच्या े संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी छिद्रे तर कुठे वरतून तारी गायब झाल्याने बिबट्यासारखे हिंस्र प्राणी गावात येतात. ग्रामस्थांचे जगणे मुश्कील होऊन बसले आहे. एचएएलने संरक्षक भिंत त्वरित दुरु स्त करावे.
- अनिल बोरस्ते,
उपसरपंच, साकोरे े(मिग).