वाघाड परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:44 PM2021-01-28T18:44:16+5:302021-01-28T18:44:50+5:30
जानोरी : तालुक्यातील वाघाड व परिसरातील शिंगाडे वस्ती येथे बिबट्याने अनेक दिवसापासून दहशत निर्माण केल्याने शेतकरी बिबट्याच्या सावटाखाली जीवन जगत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याचे दर्शन होत आहे. तसेच तालुक्यातील वाघाड परिसरातील कोकणगाव रस्त्यालगत असलेल्या शिंगाडे वस्ती येथे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या रात्री-दिवसा दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
या बिबट्याकडून कोंबड्या, कुत्रे फस्त करण्याचा सपाटा सुरू असल्याने रात्रीच्या सुमारास येथील ग्रामस्थांना जागता पहारा देण्याची वेळ आली आहे. या बिबट्यापासून मानवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी रतन शिंगाडे, नामदेव शिंगाडे,मनोहर शिंगाडे,मुरलीधर गांगोडे,सोमनाथ गांगोडे,मोतीराम माळेकर,दत्तू शिंगाडे आदींसह शेतकरी,ग्रामस्थांनी केली आहे.