धुमाकूळ घालणारा बिबट्या दोन वर्षांनी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:58+5:302021-07-24T04:10:58+5:30
कोकणगाव : निफाड तालुक्यातील कोकणगाव परिसरात शेळी कुत्रे व माणसांवर हल्ले करून दहशत पसरविणाऱ्या बिबट्यास अखेर दोन वर्षांनी ...
कोकणगाव : निफाड तालुक्यातील कोकणगाव परिसरात शेळी कुत्रे व माणसांवर हल्ले करून दहशत पसरविणाऱ्या बिबट्यास अखेर दोन वर्षांनी शुक्रवारी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
शुक्रवारी कोकणगावात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या फसल्याचे सोमनाथ रमेश मोरे यांच्या निदर्शनास आले. गावातील ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाचे अधिकारी संजय पवार, विजय टेकनर, भारत वाघ, अशोक शिंदे यांना दिली. त्यांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले.
गेल्या काही महिन्यापासून बिबट्या दिसण्याचे प्रमाण परिसरात वाढले असून, वनखात्याने आवश्यक उपाय करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
----------------------
वारंवार बदलायचा ठिकाणे बिबट्या
कोकणगाव येथील लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या सापडला. दोन वर्षांपासून हल्ले होत होते. बिबट्याच्या प्राण्यांवर माणसांवर हल्ल्यानंतर तातडीने वनविभागाला माहिती दिली जात होती. त्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत होते, मात्र बऱ्याच वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात अपयश येत होते.
हा बिबट्या आपला मार्ग वारंवार बदलत परिसरात फिरत होता. त्यामुळे वनविभागाच्या ताब्यात तो सापडत नव्हता. बिबट्याला पकडण्याचे भरपूर प्रयत्न केले, तरीही बिबट्या सापडला जात नसल्याने गावात भीतीचे वातावरण होते.
------------------
परिसरात पकडला गेलेला बिबट्या हा अंतिम नसून शिवारात अजूनही बरेच बिबटे आहे. यासाठी वनविभागाने पिंजऱ्याची अतिरिक्त सोय करावी.
- सिद्धार्थ बागुल, स्थानिक शेतकरी, कोकणगाव (२३ कोकणगाव)
230721\23nsk_8_23072021_13.jpg
२३ कोकणगाव