तामसवाडी येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:04 PM2018-09-11T13:04:06+5:302018-09-11T13:05:07+5:30
निफाड : तालुक्यातील तामसवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे .
निफाड : तालुक्यातील तामसवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे . तामसवाडी येथे बिबट्याने पोल्ट्री फॉर्ममधील काही कोबंड्या फस्त केल्याने व या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने तामसवाडी येथील शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. येवला वनविभागाने चार ते पाच दिवसांपूर्वी तामसवाडी शिवारात राहणारे भगवान आरोटे यांच्या शेतामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता . दि. १० सप्टेंबरच्या रात्री या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला. सदरची घटना तामसवाडीचे पोलीस पाटील पांडुरंग शिंदे यांनी येवला वनविभाग वनविभागाला कळवल्यानंतर येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे वनपाल जी .बी. वाघ ,विंचुरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख , वनमजूर भारत माळी , पिंटू नेहरे , यांच्या पथकाने आरोटे यांच्या शेतात तातडीने भेट दिली. पिंजºयात जेरबंद अवस्थेतील बिबट्या वन विभागाच्या वाहनात हलवला. यासाठी पोलीस पाटील पांडुरंग शिंदे ,भगवान आरोटे ,समाधान आरोटे ,दीपक आरोटे , बाळू गीते , पप्पू खोडे,नारायण वैद्य यांचे सहकार्य लाभले. या बिबट्याला निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चांदोरे यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली व त्यानंतर बिबटयÞाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाने पुढील कार्यवाही केली. हा नर बिबट्या चार ते पाच वर्षांचा असून त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बिबट्या जेरबंद केल्याने तामसवाडी येथील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. (११ निफाड १)