तामसवाडी येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:44 PM2019-03-02T14:44:46+5:302019-03-02T14:44:56+5:30
निफाड : अवघ्या सात दिवसापूर्वी तालुक्यातील तामसवाडी येथे ज्या शेतात बिबट्या पिंजऱ्या जेरबंद झाला होता, त्याच ठिकाणी दि १ मार्च रोजी पुन्हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
निफाड : अवघ्या सात दिवसापूर्वी तालुक्यातील तामसवाडी येथे ज्या शेतात बिबट्या पिंजऱ्या जेरबंद झाला होता, त्याच ठिकाणी दि १ मार्च रोजी पुन्हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा मादी बिबट्या दीड वर्षाचा आहे. तामसवाडी येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वन विभागाने सोळा दिवसापूर्वी तामसवाडी येथील किरण रामनाथ शिंदे यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. दि. २३ फेब्रुवारीच्या रात्री या पिंजर्यात नर बिबट्या जेरबंद झाला होता. मात्र याच परिसरात अजून एका बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शिंदे यांनी वनाधिकाºयांना सांगितले. त्यामुळे ज्या ठिकाणी पहिला बिबट्या जेरबंद झाला त्याच ठिकाणी शिंदे यांच्या शेतात लगेचच दुसरा पिंजरा तातडीने लावण्यात आला. शुक्र वारी दि १ मार्च रोजी रात्री १०.३० च्या सुमारास हा दुसरा बिबट्या जेरबंद झाला.