कळवण तालुक्यात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 02:40 PM2019-02-20T14:40:30+5:302019-02-20T14:41:29+5:30
कळवण - दुष्काळाच्या झळा आता मानवासोबतच प्राण्यांनाही बसू लागल्याने शहर, गाव, खेड्यापाड्यात आता बिबट्याचा मुक्त संचार दिसू लागला आहे. कळवण तालुक्यातील जामले पाळे गावातून एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या यंत्रणेला यश आले आहे.
कळवण - दुष्काळाच्या झळा आता मानवासोबतच प्राण्यांनाही बसू लागल्याने शहर, गाव, खेड्यापाड्यात आता बिबट्याचा मुक्त संचार दिसू लागला आहे. कळवण तालुक्यातील जामले पाळे गावातून एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या यंत्रणेला यश आले आहे. कळवणच्या वनविभागाला जामले पाळे गावातून ग्रामस्थांनी फोन करून गावात बिबट्या असल्याचे सांगितल्याने वनविभागाने वरिष्ठ यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. नाशिकहून सहाय्यक वनसंरक्षक पूर्व विभाग नाशिकचे राजेंद्र कापसे हे, रेस्क्यू टीम सह हजर झाल्याने रात्रीच्या शोध मोहीमेत पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास बिबट्याला बेशुद्ध करीत मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात अडकला. पाच वर्ष वय असलेला हा बिबट्या मादी जातीचा असून आदिवासी भागातील नागरिकांची डोकेदुखी ठरत होता.बिबट्यामुळे अभोणा, कनाशी परिसरातील जनतेत भितीचे वातावरण होते.अखेर त्याला जेरबंद करण्यात यश आले. अभोणा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ डी एन पाईकराव यांनी तपासणी केली.या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख,वनपरिमंडळ अधिकारी शशिकांत वाघ,योगीराज निकम,शंकर हिरे,पंकज देवरे,पाल,पवार, चव्हाण, कांबळी आदी सहभागी झाले होते. कळवण वनविभागात बिबट्या आणण्यात आल्यानंतर वैद्यकीय सूत्रांच्या सूचनेनुसार त्यास जंगलात सोडण्यात येणार आहे. कळवण तालुक्यातील रवळजी,ओतूर,निवाने परिसरातही अद्याप ही बिबट्याची शक्यता असून वनविभागाने दक्ष राहण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यापूर्वी दत्तनगरला पिंजरा ठेवण्यात आला होता.मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.