जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:51 PM2018-01-21T22:51:43+5:302018-01-22T00:19:07+5:30

काकडगाव परिसरात शनिवारी (दि. २०) रात्री १२ वाजेच्या सुमारास पशुपालक संजय दगा अहिरे यांच्या वासरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.  काकडगावसह नामपूर परिसरात गत महिन्यापासून नर-मादी बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, दिवसाढवळ्या अनेकदा नागरिकांना दर्शनही झाले आहे. परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. रात्री नर व मादी असे दोन बिबटे एकत्र फिरतात व दिवसा उसाच्या शेतात लपून बसतात. 

 Leopards attack in the district | जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच

जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच

googlenewsNext

नामपूर : काकडगाव परिसरात शनिवारी (दि. २०) रात्री १२ वाजेच्या सुमारास पशुपालक संजय दगा अहिरे यांच्या वासरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.  काकडगावसह नामपूर परिसरात गत महिन्यापासून नर-मादी बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, दिवसाढवळ्या अनेकदा नागरिकांना दर्शनही झाले आहे. परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. रात्री नर व मादी असे दोन बिबटे एकत्र फिरतात व दिवसा उसाच्या शेतात लपून बसतात.   शनिवारी रात्री बिबट्याने संजय अहिरे यांच्या वासरावर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वासराचा जीव वाचला असून, शरीरावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी काकडगावला लावण्यात आलेला पिंजरा केवळ शोभेचे बाहुले बनला आहे. बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले नसल्याने कर्मचारी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काकडगावचे शेतकरी अजित अहिरे यांनी केला आहे. काकडगाव परिसरातील शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. त्यामुळे येथे शेळ्या, मेंढ्या, दुभती जनावरे, पोल्ट्री फार्मची संख्या मोठी आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास वनखात्याला घेराव घालण्यात येईल, असा इशारा काकडगावचे सरपंच निंबा सोनवणे, राजाराम पाटील, अजित अहिरे, नंदलाल अहिरे, संदीप अहिरे, शिवाजी अहिरे, पप्पू अहिरे, संजय अहिरे, प्रभाकर अहिरे यांच्यासह शेतकºयांनी दिला आहे. 
मेंढपाळ धास्तावले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 
निफाड : शुक्र वारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तालुक्यातील रु ई येथे शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या  रु ई येथे भास्कर तासकर हे कोळगाव रोडलगत शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर शेळ्या बांधलेल्या होत्या. शुक्र वारी रात्रीच्या सुमारास यातील एका शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला होताच शेळ्यांच्या झालेल्या आरडाओरडीने तासकर कुटुंबाने तातडीने घराबाहेर बांधलेल्या शेळ्यांकडे धाव  घेतली. त्यानंतर बिबट्या पसार झाला. या शेळीला बांधलेल्या खुंट्याची दोरी न तुटल्याने बिबट्याला शेळीला ओढून नेता आले नाही. मात्र या हल्ल्यात शेळी ठार झाली. ही घटना तासकर यांनी वनविभागाला कळवली. घटना कळताच येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या आदेशान्वये वनरक्षक विजय टेकणर,  वनसेवक भय्या शेख, भारत माळी, पिंटू नेहरे  आदींचे पथक तासकर यांच्या शेतात दाखल झाले.  या पथकाने घटनेची माहिती घेतली. या घटनेचा पंचनामा केला. गुरु वारी रात्री बिबट्यांच्या हल्ल्यात खेडलेझुंगेला वासरी, ब्राह्मणवाड्याला म्हशीचा टोणगा, महाजनपूर येथे मेंढी व तिचे कोकरू असे एकूण चार पाळीव प्राणी ठार झाल्याची घटना घडली होती.

Web Title:  Leopards attack in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.