भऊर-विठेवाडी शिवारात बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:17 PM2021-03-01T20:17:45+5:302021-03-02T01:18:29+5:30
लोहोणेर : देवळा तालुक्यातील गिरणा नदी काठावरील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारात सध्या बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरात मादी बिबटयासह बछड्यांचे दर्शन अनेकांना झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे.

या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली. सध्या उन्हाळ कांद्याना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून येथील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने आतापर्यंत अनेक शेळ्या, मेंढ्या, वासरे फस्त केली आहेत. मागेही असाच प्रकार झाला असता तेंव्हा पिंजरा लावताच बिबट्या जेरबंद झाला होता.
आताही तशाच प्रकारे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी सुभाष पवार, पोपट पवार, योगेश पवार, अमर जाधव, दीपक पवार, प्रविण जाधव, कांदा उत्पादक संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव आदींनी केली आहे.