डांगसौंदाणेत बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:18 PM2021-02-26T23:18:52+5:302021-02-27T00:54:15+5:30
डांगसौदाणे परिसरातील निंबा सुलक्षण यांच्या शेतवस्तीजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
डांगसौदाणे : परिसरातील निंबा सुलक्षण यांच्या शेतवस्तीजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
डांगसौदाणे परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. शेतकरी वर्गाची मागणी लक्षात घेता वनविभागाकडून तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता . शुक्रवारी (दि.२६) पहाटे सावजाच्या शोधात बिबट्या या वस्तीजवळ आला व पिंजऱ्यात ठेवलेल्या बकरीवर झडप घालण्याच्या प्रयत्नात अलगद पिंजऱ्यात अडकला. याबाबत सदर शेतकरी वर्गाकडून वनविभागाला माहिती देण्यात आल्यावर वनविभागाचे वनरक्षक नवनाथ मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. वनविभागाकडून सदर जेरबंद बिबट्याचा पिंजरा वाहनाने घटनास्थळावरून हलवून सटाणा विभाग कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आला आहे. याच शेत शिवारात अजून तीन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून पशुपालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.