गोसराणेत बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 06:23 PM2020-09-07T18:23:49+5:302020-09-07T18:24:22+5:30
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील गोसराणे-बार्डे शिवारात एक महिन्यापासून बिबट्याची दहशत निर्माण होऊन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंर झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने गोसराणे येथील शेतकरी बळीराम मोरे यांच्या घरासमोरील एक शेळी हल्ला करून ठार मारली होती. हा संपूर्ण घटनाक्र म सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. त्या दिवसापासून परिसरातील गोसराणे, बेलबारे, बर्डे, आसोली, हिंगवे पांडे आदी खेड्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. लहान मुलांना बाहेर पडणे मुश्कील झाले होते. तसेच शेतकरी शेतात कामास जाण्यासाठी घाबरत होते. त्यामुळे परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे वनविभागाने बार्डे व गोसराणे येथे दोन पिंजरे लावले होते. पंधरा दिवसांनंतर बार्डे येथील शेतकरी पंडित वाघ यांच्या घरासमोर लावलेल्या पिंजºयात असलेल्या शेळीच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या अखेर जेरबंद झाला. यामुळे वनविभागाने तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेच नि:श्वास घेतला आहे.