तारुखेडले येथे बिबट्या जेरबंद; आतापर्यंत सहा बिबटे पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 03:44 PM2022-09-10T15:44:34+5:302022-09-10T15:46:45+5:30
वनविभागाने तीन दिवसांपूर्वी मागणी नुसार पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात सकाळी भरदिवसा बिबट्या अडकला.
सायखेडा जि. नाशिक : निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे राजेश संपत सांगळे यांच्या शेतात शुक्रवारी बिबट्या जेरबंद करण्यात आला. सदर बिबट्या हा दोन ते तीन वर्ष वयाचा असून मादी आहे. या परिसरात आतापर्यंत पाच ते सहा बिबटे पकडण्यात आले आहेत. येथील जगताप वस्ती व शेजारी असलेली गवळी वस्ती परिसरातील नागरिक भयभीत असून या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
वनविभागाने तीन दिवसांपूर्वी मागणी नुसार पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात सकाळी भरदिवसा बिबट्या अडकला. दिवसा बिबट्या जेरबंद झाल्यामुळे तारुखेडले परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहेत. तारुखेडले हे गाव बिबटे प्रवरण क्षेत्र म्हणून घोषित आहे. आता पर्यंत १० पेक्षा जास्त बिबटे तारुखेडले गावात जेरबंद करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या होत्या. त्यामुळे वन विभागाने पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद झाला. तारुखेडले गावात आता पर्यंत बिबट्या हल्ल्यात दोन लहान मुलींचे प्राण गेले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी उपाय योजना करणे गरजेचे आहे. परिसरात अजून बिबट्यांचा संचार आहे, त्यामुळे पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी तारुखेडले येथील ग्रामस्थांनी केली आहे. आता निफाड तालुक्यात नविन स्वतंत्र वन कार्यालय होणे गरजेचे आहे, पिंजरे व वन कर्मचारी संख्या वाढवणे गरजेचे आ.हे त्याच बरोबर गस्त वाढवणे ही आवश्यक आहे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बिबटे हे गवळी वस्ती, जगताप वस्ती येथे दोन ते तीन महिन्यापासून आहेत. पिजरा लावण्यात यावा व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा.
"तारुखेडले गाव बिबटे प्रवण क्षेत्र म्हणून घोषित आहे, परंतु वन विभाग मार्फत सोय सुविधा पाहिजे तशा भेटत नाही. गस्त वाढवणे,कायमस्वरूपी पिंजरे देणे, औषध उपचार, तत्काळ पंचनामा, भरपाई मिळणे अशी सुविधा मिळाल्या पाहिजे.
. प्रशांत गवळी, समाजिक कार्यकर्ते, तारुखेडले