तामसवाडी शिवारात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:40+5:302021-09-23T04:15:40+5:30
गोदाकाठ भागात ऊसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळते. जवळच गोदावरी नदी असल्यामुळे पिण्याचे पाणीही ...
गोदाकाठ भागात ऊसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळते. जवळच गोदावरी नदी असल्यामुळे पिण्याचे पाणीही मिळते. हा परिसर शेतीचा असल्यामुळे अनेक छोटी वासरे, शेळी, मेंढी त्याचप्रमाणे श्वान असल्यामुळे बिबट्याला भक्ष मिळते. बिबट्या वास्तव्यास राहील, असे सगळे वातावरण असल्यामुळे या परिसरात बिबटे कायम येतात. गोदाकाठच्या बेचाळीस गावांमध्ये वारंवार कुठेतरी बिबट्या दिसल्याची चर्चा होते. या परिसरात अनेकदा बिबट्याकडून लहान मुलांवर हल्ले झाले आहेत. त्यात काही मुलांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
---------------------
गोदावरी नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. ऊसाचे क्षेत्र, पिण्यासाठी पाणी, छोटी जनावरे, शेळी, श्वान असल्यामुळे बिबट्या सातत्याने भक्ष्याच्या शोधात येतो. बिबट्याचा वावर असल्यामुळे सुगीच्या दिवसात शेतात काम करायला जाताना जीव मुठीत धरूनच जावे लागते. वन विभागाने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
- योगेश शिंदे, शेतकरी, तामसवाडी (२२ सायखेडा बिबट्या)
220921\22nsk_8_22092021_13.jpg
२२ सायखेडा बिबट्या