कोळवाडीत बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:35 AM2020-07-16T00:35:17+5:302020-07-16T00:35:17+5:30
निफाड तालुक्यातील कोळगाव येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटया जेरबंद झाला आहे. हा नर बिबट्या ६ वर्ष वयाचा आहे.
निफाड : तालुक्यातील कोळगाव येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटया जेरबंद झाला आहे. हा नर बिबट्या ६ वर्ष वयाचा आहे.
दहा ते बारा दिवसापासून कोळगाव परिसरात बिबटयाने दहशत निर्माण केली होती. त्यामुळे शेतकरी धास्तावले होते. शेतात वस्तीवर राहणारे व शेतीकाम करणारे शेतकरी व मजूर दहशतीखाली होते. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
सदर माहिती वनविभागाला कळवल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे वनपाल जी. बी. वाघ, वनरक्षक विजय टेकनर , वनसेवक भैय्या शेख , आर .एल. बोरकडे, भगवान भुरूक आदीचे पथक कोळगाव येथे पोहोचले. वन विभागाच्या वाहनातून या जेरबंद बिबट्यास निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र चांदोरे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली.
दरम्यान, बिबट्याला त्याच्या अधिवासात सोडण्याची प्रक्रिया वनविभागाने सुरू केली आहे.
सकाळी पिंजºयात
वनविभागाने दि. १३ जुलै रोजी सुधाकर छबु घोटेकर यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता. बुधवारी (दि.१५) सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला.