अल्प लसीकरण, अत्यल्प टेस्टिंग, तिसरी लाट कशी राेखणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:05+5:302021-05-11T04:15:05+5:30
नाशिक : भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच ...
नाशिक : भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत; पण ही लाट नेमकी कधी येणार, याचा प्रादुर्भाव किती काळ असेल, यातून कसे सरंक्षण करायचे याबाबत तज्ज्ञांमध्येही मतभिन्नता आहे. अशा परिस्थितीत कमी झालेले टेस्टिंग, लसीकरणाची मंदगती असताना तिसरी लाट कशी रोखली जाणार ? हीच सध्याची सर्वांत मोठी समस्या आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते. काही तज्ज्ञांच्या मतानुसार ती जूनमध्ये, तर काहींच्या मतानुसार ती सप्टेंबरमध्ये येऊ शकते. थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती सर्वाधिक असते. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यापूर्वी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. तसेच पुढील काळात बालके आणि तरुण लोकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे; पण जेव्हा ती येईल तेव्हा ती किती धोकादायक असेल, याबद्दल काहीही सांगता येणार नाही. कोरोनाच्या विषाणूचे सातत्याने रूपांतर होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार असायला हवे. कोरोनाची लस प्रभावी आहे; पण त्यात अजून कशी सुधारणा करता येईल, यावर संशोधन सुरू आहे.
तिसऱ्या लाटेपूर्वी तीन बाबींवर भर
कोरोनाची तिसरी लाट ही तीन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून आहे. त्यातील पहिला घटक म्हणजे लसीकरण, दुसरा सुपर स्प्रेडर रोखणे आणि तिसरा नवी व्हेरिएंटचा शोध घेणे. म्हणजे सर्वांत आधी येत्या डिसेंबरपर्यंत आपल्याला कोरोना लसीकरण करावे लागेल. त्यानंतर दुसरे म्हणजे आपण सुपर स्प्रेडर इव्हेंटला किती रोखू शकतो. तिसरे म्हणजे आपण नवीन व्हेरिएंटचा शोध किती वेळात घेतो आणि त्याला कसे रोखतो, यावर सर्व गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
इन्फो
अधिकाधिक लसीकरण निर्णायक
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यातील काहींना कोरोनासदृश लक्षणेही जाणवत नाहीत; पण तरीही त्यांना लागण झाल्याचे उघड होत आहे. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना सर्वप्रथम लस देणे गरजेचे आहे. पुढील सहा महिन्यांत लसीकरणाचा कार्यक्रम तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होईल.
इन्फो
चाचणी सुविधा वाढवावी लागेल
अनेक राज्यांनी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाययोजना करावी लागेल. त्यात सर्वांत प्रथम लसीकरणाची योजना आखावी लागेल. दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्यासोबत आपल्याला कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्या लागतील, तसेच चाचणी सुविधा वाढवावी लागणार आहे.
इन्फो
लहान मुलांच्या बचावाला प्राधान्य
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर सुरू आहे. ही लाट आटोक्यात येताच तीन-चार महिन्यांनंतर तिसऱ्या लाटेचा धोका उभा राहणार आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मात्र, अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही, पुढील काही महिन्यांतच देशातील बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होणार आहे; परंतु एक चिंतेचा विषय म्हणजे १८ वर्षांखालील मुलांचे कोरोना लसीकरण होणार आहे. ही मुले अजूनही कोरोना लसीकरण मोहिमेपासून वंचित आहेत. कारण आपल्या देशात अद्याप लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक निशाण्यावर राहण्याची शक्यता आहे.
--------------
ही डमी आहे.