पिकविम्याकडे श्ोतकºयांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 11:59 PM2017-08-02T23:59:21+5:302017-08-03T00:45:41+5:30
येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव, आंगुलगाव, न्याहरखेडा, पांझरवाडी आदि गावांतील शेतकरी पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळूनही उदासीन असल्याचे चित्र आहे. बुधवार २ आॅगस्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत केवळ ६ शेतकºयांनी विमा भरल्याची माहिती बँके कडून मिळाली आहे.
सायगाव : येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव, आंगुलगाव, न्याहरखेडा, पांझरवाडी आदि गावांतील शेतकरी पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळूनही उदासीन असल्याचे चित्र आहे. बुधवार २ आॅगस्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत केवळ ६ शेतकºयांनी विमा भरल्याची माहिती बँके कडून मिळाली आहे.
आंगुलगाव येथील ५ शेतकºयांनी व न्याहरखेडा येथील १ शेतकºयाचा समावेश आहे. सायगाव , पांजरवाडी येथील एकाही शेतकºयाने पिकविमा भरला नाही. यापूर्वी अनेक वर्ष शेतकरी विमा भरत आले. परंतु सरकार व विमा कम्पनी च्या जाचक अटीमुळे शेतकरी विमा भरण्यास उदासीन असल्याची चर्चा शेतकºयांत आहे.
अन्य जिल्ह्यात शेतकºयांनी पिक विमा भरण्यास गर्दी केली आहे. पारंपारिक पिकांनाच विमा संरक्षण आहे. त्यामुळे सायगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत गेल्या पाच दिवसात केवळ ६ शेतकºयांनीच पिकविमा उतरविला आहे. कृषि विभागाचे कर्मचारी सायगाव येथील बँकेत ठाण मांडून होते. त्यांनी पिक विमा योजनेचा प्रचार केला परंतु शेतकºयांना पिक विम्याबाबत यापूर्वी आलेल्या अनुभवामुळे शेतकरी पिकविमा भरण्यास तयार नसल्याचे येथील शेतकरी बोलून दाखवत आहे. सायगाव् येथील जिल्हा बँकेला सोमवार साप्ताहिक सूटी असते. परन्तु पिकविमा भरण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख होती.त्यामुळे कर्मचारी सुटीच्या दिवशी पिकविमा काढण्यासाठी बँकेत हजर होते. परन्तु त्या दिवशी एकही शेतकरी पिकविमा भरण्यासाठी बँकेत फिरकला नाही.