गोदापार्कवर कचरा टाकणाऱ्यांना जागरूक युवकांनी शिकविला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:54+5:302021-05-16T04:13:54+5:30

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक टॉप फाइव्हमध्ये यावेत, यासाठी महापालिका प्रयत्न करते आणि काही सजग नागरिकही प्रयत्न करतात, ...

A lesson taught by the conscious youth to those who throw garbage at Godapark | गोदापार्कवर कचरा टाकणाऱ्यांना जागरूक युवकांनी शिकविला धडा

गोदापार्कवर कचरा टाकणाऱ्यांना जागरूक युवकांनी शिकविला धडा

googlenewsNext

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक टॉप फाइव्हमध्ये यावेत, यासाठी महापालिका प्रयत्न करते आणि काही सजग नागरिकही प्रयत्न करतात, परंतु आपल्याला त्याच्याशी काही घेणे-देणे नाही, अशा आविर्भावात वावरणाऱ्यांना मात्र आता काळजी घ्यावी लागणार आहे.

गंगापूर रोडवर गोदावरी नदी किनारी असलेल्या गाेदापार्कजवळ काही नागरिक जॉगिंगसाठी जात असतात. ॲड.सुयोग शहा, सागर काबरे, मिलिंद वाघ, विनय बिरारी, प्रवीण काळे, संजय देशमुख, तसेच कोठावदे हे नियमितपण जात असताना गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी गोदापार्कवर कचरा टाकल्याचे आढळले. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी महापालिकेने येथे कचरा टाकू नये, अन्यथा दंड करण्यात येईल, असा फलकही लावला आहे. त्या भोवतीच पिझ्झाचे खोके आणि अन्य कचरा होत्या. त्यामुळे सुयोग शहा आणि सागर काबरे यांनी त्यातून बिल शोधून काढले आणि त्यावर ज्यांना पिझ्झा दिला त्या ग्राहकाचा मोबाइल नंबर असल्याने सुयोग यांनी त्यांना फोन लावला आणि कचरा टाकल्याबाबत सुरुवातीला विचारणा केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या युवक आणि युवतीने नंतर मात्र तेथे येऊन स्वच्छता करून देतो, असे मान्य केले आणि त्यानंतर खरोखरीच तेथे येऊन कचरा हटविला. त्यानंतर, तक्रार करणाऱ्या ॲड.शहा यांनी महापालिकेच्या ॲपवरही तक्रार केली.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागात कचरा फेकणाऱ्यांवर त्यांनी नजर ठेवली. एक नागरिक मेलेला कुत्रा नदीपात्रात टाकण्यात जात असताना, त्याला हटकवून पळवून लावले, तर कचरा टाकणाऱ्या अनेक नागरिकांबाबत थेट महापालिकेच्या ॲपवर तक्रार केली. त्यामुळे महपाालिकेनेही सजग होऊन गोदापार्कचा संपूर्ण कचराही साफ केल्याने गोदापार्क लख्ख झाला आहे. त्याचबरोबर, कचरा टाकणाऱ्यांनाही धडा मिळाला आहे.

कोट...

पिझ्झाचे खोके आणि अन्य कचरा टाकणाऱ्यांना फोन केल्यानंतर एका युवतीच्या मित्रांनी नंतर फोनवर धमकवण्याची भाषाही केली. मात्र, पेालिसांत तक्रार करण्याची तयारी केल्यानंतर त्यांनी मग मवाळ भूमिका घेतली. सर्वच नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी काळजी घेतली पाहिजे.

- ॲड.सुयोग शहा, सामाजिक कार्यकर्तेे

------

समवेत छायाचित्र आर फोटोवर १५ गेादापार्क नावाने.... गोदापार्कच्या ठिकाणी ज्यांनी कचरा टाकला, त्याच युवकांनी नंतर कचरा साफ केला.

Web Title: A lesson taught by the conscious youth to those who throw garbage at Godapark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.