दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:06 AM2018-12-23T01:06:17+5:302018-12-23T01:06:39+5:30

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़

 Lessons for cyber security to two lakh college students | दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

Next

नाशिक : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़  शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या सोशल मीडियाचे फायदे - तोटे तसेच धोके यांची जाणीव व्हावी यासाठी शहर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी सायबर सुरक्षिततेचे धडे देण्याचा उपक्रम वर्षभरापूर्वी सुरू केला होता़ या उपक्रमाचा गत वर्षभरात सुमारे दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, त्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यात आले आहेत़
प्लॅस्टिक मनी ही तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाचीच गरज बनली आहे़ मात्र याच तंत्रज्ञानाचाच दुरुपयोग तसेच हाताळणीतील चुकांमुळे तंत्रज्ञान अवगत असलेल्या भामट्यांकडून आॅनलाइन पद्धतीने बँकेतील पैसे काढून घेणे, एटीएम क्लोनिंग, पासवर्ड हॅकिंग याद्वारे पैशांची अफरातफर केली जाते आहे़ याबरोबरच नोकरीचे आमिष दाखवून तसेच मेट्रीमॅन्यूअल साईटवरूनही फसवणूक केली जात असून चोरीचे नवनवीन फंडे अमलात आणले जात आहेत़ त्यामुळे सायबर सुरक्षिततेचे धडे ही काळाची गरज बनली आहे़
मोबाइल व सोशल मीडियाच्या वापरात शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़ पोलीस आयुक्त सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयमार्फत विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची हाताळणी कशी करावी, सोशल मीडियातील धोके, आॅनलाइन पद्धतीची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने केली जाणारी फसवणूक, विवाहाच्या संकेतस्थळावरून तरुण-तरुणी वा विधवा महिलांची होणारी फसवणूक याबाबत माहिती व्हावी, यासाठी वर्षभरापासून सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यास सुरुवात केली़ गत वर्षभरात शहरातील २०० ते २५० शाळा व महाविद्यालयांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यात आले आहेत़
सायबर अ‍ॅम्बॅसिडर संकल्पना
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सायबर सुरक्षिततेसाठी एक स्वतंत्र पथक निर्माण केले असून त्यांच्यामार्फत शहरातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे दिले जातात़ या पथकाने सायबर विषयातील तज्ज्ञ तसेच संगणक शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सायबर अ‍ॅम्बॅसिडर म्हणून नेमले आहे़ हे सायबर अ‍ॅम्बॅसिडर पोलीस पथकासमवेत शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह सायबर सुरक्षिततेचे धडे देतात़
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक मोबाइल देतात मात्र, या मोबाइलचा वापर आपला पाल्य नेमका कशासाठी करतो याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात़ विद्यार्थ्यांच्या हातात आलेल्या या तंत्रज्ञानातील विविध सोशल मीडियाचा वापरातील धोक्यांबाबत त्यांना जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमासाठी शंभर ते दीडशे सायबर अ‍ॅम्बॅसिडर तयार करण्यात आले असून पोलीस व अ‍ॅम्बेसिडर यांच्याकडून सायबर सुरक्षिततेचे धडे देण्याचा उपक्रम सुरू आहे़
- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

Web Title:  Lessons for cyber security to two lakh college students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.