वीस हजार विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे धडे

By Admin | Published: March 7, 2017 10:17 PM2017-03-07T22:17:15+5:302017-03-07T22:17:15+5:30

शहर पोलीस आयुक्तालय;सायबर क्राईम रोखण्यासाठी प्रशिक्षण

Lessons for cybercrime to twenty thousand students | वीस हजार विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे धडे

वीस हजार विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे धडे

googlenewsNext

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना सायबर क्राईम रोखण्यासाठी वा काळजी घेण्याबाबत प्रशिक्षण दिले असून प्रशिक्षित विद्यार्थी हे गुन्हे रोखण्यासाठी पुढे येतील असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ़रविंद्रकुमार सिंघल यांनी व्यक्त केला आहे़
माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेटद्वारे सर्व आवश्यक वा अनावश्यक माहिती अगदी सहज उपलब्ध होते़ व्हाटस अप, फेसबुक, टिष्ट्वटर यासह विविध सोशल मीडीयातील अ‍ॅप्लिकेशनने तरुणांवर ताबा मिळविला आहे़ याद्वारे मग आॅनलाईन फसवणूकीसारखे प्रकार समोर येत आहेत़ नागरिकांची फसवणूक होऊ नये तसेच सायबर गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी गतवर्षी आॅगस्टमध्ये शहर पोलीस आयुक्तालयात सायबर शाखा सुरू करण्यात आली़
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती होणे गरजेचे आहे़ ही गरज ओळखून पोलीस आयुक्तांनी शहरातील ४० शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम प्रतिबंधक प्रशिक्षण दिले आहे़ यामुळे आॅनलाईन फसवणूक तसेच सायबर क्राईमच्या घटना रोखल्या जातील तसेच प्रशिक्षित विद्यार्थी नागरिकांमध्ये जनजागृती करतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Lessons for cybercrime to twenty thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.