रब्बी पीकविम्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:24+5:302020-12-15T04:31:24+5:30
चौकट - जिल्ह्यात रब्बीचा पेरा (हेक्टर) गहू - २८६५५ .०४ हरभरा - १९६८९.४० मका - ३४२२.६० ज्वारी - २१७५ ...
चौकट -
जिल्ह्यात रब्बीचा पेरा (हेक्टर)
गहू - २८६५५ .०४
हरभरा - १९६८९.४०
मका - ३४२२.६०
ज्वारी - २१७५
आतापर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेला पीक विमा -३८००
चौकट -
अद्याप ९९ कोटींचे अनुदान अपेक्षित
खरिपात वेळाेवेळी झालेली अतिवृष्टी आणि वादळामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी २१० कोटी रुपयांची आवश्यकता असून आतापर्यंत शासनाने १११ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. अद्याप ९९ कोटी रुपयांच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
कोट -
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तरी पीक विमा मिळेलच याची शाश्वती नाही. पीक विमा भरून घेतात पण नंतर त्याकडे कुणीही फारसे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. यामुळे आम्ही पीक विमा काढलेला नाही. मागे अतिपावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण त्यांना भरपाई मिळाली नसल्याची अनेक उदाहरणे आहेत.
- लक्ष्मण थोरात, शेतकरी