विद्यार्थी गिरवणार आंतरराष्टÑीय शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:51 PM2019-05-22T18:51:50+5:302019-05-22T18:52:43+5:30

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव जिल्हा परिषद शाळेला महाराष्टÑ आंतरराष्टÑीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली आहे. राज्यातील १०० शाळांना आंतरराष्टÑीय शिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून त्या १०० शाळांमध्ये सिन्नरच्या माळेगाव जिल्हा परिषद शाळेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्टÑीय दर्जाच्या शिक्षणाचे धडे गिरविण्यास मिळणार आहेत.

 Lessons of International Education in India | विद्यार्थी गिरवणार आंतरराष्टÑीय शिक्षणाचे धडे

विद्यार्थी गिरवणार आंतरराष्टÑीय शिक्षणाचे धडे

Next

ई-लर्निंग स्कूल, सुसज्ज इमारत, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, शाळेवर नजर ठेवून असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि अध्यापनाचे दर्जेदार धडे देणारे शिक्षक या जोरावर माळेगाव शाळेने महाराष्टÑ आंतराष्टÑीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळवली आहे. इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने किंबहुना शिक्षकही तेवढे प्रशिक्षित नसल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आंतराष्ट्रीय स्तरावर मागे पडतात. हीच बाब हेरून पहिल्या टप्प्यात राज्यातील १०० शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये अध्यापनासाठी येणाऱ्या शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात आले असून त्यांची लेखी आणि तोंडी परीक्षाही घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ७ तर दुसºया टप्प्यात आणखी ७ शिक्षकांना आंतरराष्ट्रीय अध्यापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळेच्या उत्कर्षासाठी झटणा-या येथील सरपंच संगीता मंगेश सांगळे, माजी सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे यांच्यासह उपसरपंच आणि सदस्यांनी गावच्या शाळेचा आंतरराष्ट्रीय शाळेत समावेश झाल्याने समाधान व्यक्त केले.

Web Title:  Lessons of International Education in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.