विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे

By admin | Published: October 16, 2016 01:11 AM2016-10-16T01:11:00+5:302016-10-16T01:11:40+5:30

विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे

Lessons to learn about students | विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे

विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे

Next

मनमाड : रासेयो शिबिराचे उद्घाटनमनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. अशोक सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हरिष आडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रचार्य डॉ.डी.जी. जाधव, बी. डी. काकडे, के.पी. पवार, कुलसचिव शरद केदारे व्यासपीठावर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रा.जे.के. देसले यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा हेतू विशद केला. प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना श्रमदान व श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजावून सांगितले.
हरिष आडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.एन.टी. पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रा.पी.व्ही. अहिरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती बोडके यांनी केले.
(वार्ताहर)

Web Title: Lessons to learn about students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.