मतदार जागृतीकडे नवमतदारांचीच पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:16 AM2019-02-26T01:16:14+5:302019-02-26T01:16:32+5:30

आगामी निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये नवमतदारांना नाव नोंदणी सुलभ होण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस मतदान केंद्रांवर अधिकारी उपस्थित होते

Lessons of the Opposition to voter awareness | मतदार जागृतीकडे नवमतदारांचीच पाठ

मतदार जागृतीकडे नवमतदारांचीच पाठ

Next

नाशिक : आगामी निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये नवमतदारांना नाव नोंदणी सुलभ होण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस मतदान केंद्रांवर अधिकारी उपस्थित होते. मात्र, या सुविधेचा फारसा लाभ घेतला गेला नाही. अनेक मतदान केंद्रांवर किरकोळ उपस्थिती होती. काही ठिकाणी अधिकारीच उपस्थित नव्हते, तर अनेक ठिकाणी योग्य ते अर्जच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
शहरातील विविध मतदान केंद्रांवर बीएलओ तसेच अन्य अधिकारी शनिवार व रविवार उपस्थित राहून नवमतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीमध्ये असलेल्या नावांमध्ये दुरुस्ती, बदल अशी कामे केली जाणार होती. मात्र काही ठिकाणी अधिकारी उपस्थित होते परंतु त्यांच्याकडे योग्य ते अर्जच उपलब्ध नव्हते. काही ठिकाणी अधिकारी व कर्मचारी फिरकलेच नाहीत तर बऱ्याच ठिकाणी मतदारांनीच या मोहिमेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये बराच गाजावाजा करून केलेली ही मोहीम फसलेलीच दिसते.

Web Title: Lessons of the Opposition to voter awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.