पालखी पदयात्रेतील भाविकांना रस्ते सुरक्षेसंबंधी धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 07:29 PM2021-02-01T19:29:29+5:302021-02-02T00:53:51+5:30
नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्त्याने पदयात्रेत चालताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेचे मार्गक्रमण सुरू असतानाच सिन्नर-शिर्डी या महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत सदर पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना ३१ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ नांदूरवैद्य तसेच वाघेरे या संयुक्त साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले.
या रस्ते सुरक्षा अभियानात नांदूरवैद्य साई पालखी पदयात्रा समितीचे सामाजिक कार्यकर्ते देवीदास काजळे, दीपक जोशी, नवनाथ कर्पे, शिवाजी काजळे, गणेश मुसळे, आनंदा कर्पे, मुन्ना आवारी, विजय भोर, नवनाथ शेलार, सरिता काजळे, कविता वायकोळे, कविता वडनेरे, अपर्णा जोशी, कविता जोशी, दीपाली मुसळे, रूपाली यंदे, राणी कापसे, वंदना जोशी, कविता काकुळते, योगिता काकुळते, मुक्ता झाडे, सुनीता सोनवणे, सुवर्णा भोर, प्रतीक्षा सोनवणे, मोहिनी जाधव, प्रियंका सोनवणे, श्रद्धा भोर आदींसह साई पालखीतील भाविक तसेच रस्ते महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
रस्ता सुरक्षेकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. मात्र रस्ता सुरक्षा ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नसून, ती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. पोलिसांकडून रस्ते सुरक्षेसंबंधी राबविण्यात येणारे उपक्रम हे त्यांच्यासाठी नाही तर ते आपल्याच सुरक्षेसाठी असतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
- विजय आव्हाड. सिन्नर-शिर्डी महामार्ग अधिकारी.