महिलांना स्वसंरक्षणाचे धडे : आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:23 AM2018-08-26T00:23:13+5:302018-08-26T00:23:36+5:30
शिवसेना वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करीत असून, याच माध्यमातून शिवसेनेच्या वतीने राज्यभर कामकाज सुरू आहे.
सिडको : शिवसेना वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करीत असून, याच माध्यमातून शिवसेनेच्या वतीने राज्यभर कामकाज सुरू आहे. याबरोबरच मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी व त्यांना प्रतिकार करण्यासाठी युवासेनेच्या वतीने स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याने शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. सिडको प्रभाग २५ मध्ये नगरेसवक सुधाकर बडगुजर व सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांच्या वतीने आयोजित मोफत सर्वरोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराबरोबर शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे महिलांना अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यास ताकद मिळेल. कार्यक्रमास शिवसेना युवासेना नेते वरुण सरदेसाई, संपर्क नेते भाऊ चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, महानगर प्रमुख महेश बडवे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, पश्चिम मतदारसंघ संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण, सचिन मराठे, विनायक पांडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंदा दातीर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, शिरीष लवटे, श्यामकुमार साबळे, कल्पना पांडे, संगीता जाधव, पुंजाराम गामणे, माणिक जायभावे आदी उपस्थित होते.याप्रसंगी दीपक बडगुजर, पवन मटाले, सुभाष गायधनी, भूषण देवरे, देवेंद्र शेलार उपस्थित होते तर अपोलो हॉस्पिटलचे डॉ. सुधीर शेतकर, डॉ. अनिल जाधव, डॉ. अरुण खरे, डॉ. प्रवीण गोवर्धन, डॉ. मिलिंद शहा, डॉ. शरद देशमुख, डॉ. जितेंद्र शुक्ल या टीमने रुग्णांची तपासणी केली.
सावतानगर येथे सर्वरोगनिदान शिबिरात सहाशेहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. सिडको परिसरातील प्रभाग २५ मधील सावता नगर परिसरात शिवसेना पक्ष, श्री साई ज्येष्ठ नागरी संघ, प्रभाग सभापती हर्षा बडगुजर व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या वतीने सर्वरोगनिदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.