विद्यार्थीही गिरवणार तंत्रशिक्षणाचे धडे

By admin | Published: March 25, 2017 11:09 PM2017-03-25T23:09:55+5:302017-03-25T23:10:16+5:30

पेठ : माहिती तंत्रज्ञानापासून कोसो दूर असलेल्या पेठ तालुक्यातील पंगुर्णेपाडा व भाटविहिरा या आदिवासी पाड्यांवरील शाळेत आता चिमुकले पाटी-पेनऐवजी माऊस व की-बोर्ड हाताळताना दिसून येत आहे.

Lessons of Techniques to Gain Students | विद्यार्थीही गिरवणार तंत्रशिक्षणाचे धडे

विद्यार्थीही गिरवणार तंत्रशिक्षणाचे धडे

Next

पेठ : माहिती तंत्रज्ञानापासून कोसो दूर असलेल्या पेठ तालुक्यातील पंगुर्णेपाडा व भाटविहिरा या आदिवासी पाड्यांवरील शाळेत आता चिमुकले पाटी-पेनऐवजी माऊस व की-बोर्ड हाताळताना दिसून येत असून, आपुलकी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून या शाळांना संगणक संच भेट दिल्याने दऱ्याखोऱ्यातही संगणकाचे धडे गिरवणे सुरू झाले आहे.सामाजिक कार्यकर्ते तथा आपुलकीचे अध्यक्ष विलास मुनोत यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात येणारे अडथळे व मुलांमधील तंत्रज्ञानाची भीती दूर करण्यासाठी पंगुर्णेपाडा व भाटविहिरा येथील शाळांना संगणक संच भेट दिल्याचे सांगितले. संस्थेच्या वतीने मुलांना स्कूल बॅग व खाऊचेही वाटप करण्यात आले. याप्रसंगी विलास मुनोत, नवनाथ चव्हाण, श्रीमती जोशी, विलास कड, डावरे, चैतन्य भडके, शांताराम गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान गायकवाड, भागवत राऊत, मुख्याध्यापक चंद्रकांत आवारी, वसंत देवरे, सुनील नंदनवार यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Lessons of Techniques to Gain Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.