आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 02:57 PM2018-09-03T14:57:42+5:302018-09-03T14:57:52+5:30
लासलगाव: निफाड तालुक्यात अनेकदा पुरसदृश्य स्थिती अनेक गावांमध्ये होत असते त्या पाशर््वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणे (एनडीआरएफ) यांनी लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपच्या सुमारे वीस सदस्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. नांदूर मधमेश्वर येथील बंधाº्यातस्विमिंग ग्रुपचा सदस्यांनी हे प्रशिक्षण देण्यात आले. आता या प्रशिक्षणाचे धडे स्वत;स्विमिंग ग्रुप सदस्य खडक माळेगाव बंधाऱ्यात गिरऊ लागले आहेत.
लासलगाव:
निफाड तालुक्यात अनेकदा पुरसदृश्य स्थिती अनेक गावांमध्ये होत असते त्या पाशर््वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणे (एनडीआरएफ) यांनी लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपच्या सुमारे वीस सदस्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. नांदूर मधमेश्वर येथील बंधाº्यातस्विमिंग ग्रुपचा सदस्यांनी हे प्रशिक्षण देण्यात आले. आता या प्रशिक्षणाचे धडे स्वत;स्विमिंग ग्रुप सदस्य खडक माळेगाव बंधाऱ्यात गिरऊ लागले आहेत.
निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी परिसरात पावसाळ्यात अनेकदा पाण्यात नागरिक अडकून पडल्याची परिस्थिती तयार होते. त्यावेळी अडकलेल्या नागरिकांना योग्य पद्धतीने वाचवता यावे या करिता लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपच्यावतीने निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्याकडे प्रशिक्षण मिळण्याची विनंती केली होती.
नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सांगण्यावरून गेल्या दोन दिवसांपूर्वी नांदूर मधमेश्वर बंधारा येथे एनडीआरएफचे सहाय्यक निरीक्षक ददन तिवारी, मुख्य आरक्षक कुंदन राऊत ,ज्ञानेश्वर निकम
यांच्या टीमने लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपचे सदस्य अनिल बोराडे, इंद्रनील खंडारे, स्वप्नील जैन, विनोद पोटे ,जनार्दन अनावडे ,विलास चव्हाणके प्रमोद महानुभाव ,रामु सगळे ,श्रीहरी शिंदे ,प्रफुल्ल धनाइत ,महेश जगताप, संदीप काळोगे , उत्तम कदम ,मयुर वाकचौरे ,बंटी भारती, राजेंद्र जाधव, बिद्रप्रसाद वाबळे , विनोद भुतडा, संदिप अग्रवाल , रा स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपच्या वतीने जेंद्र राणा ,सुनील ठोंबरे, निलेश देसाई यांना आपत्कालीन स्थितीमध्ये सापडलेल्या नागरिकांना वाचिवण्याचे प्रशिक्षण घेतले. असून लासलगाव नजीक खडक माळेगाव येथे या सर्व टीमचा आता सराव जोमाने सुरू आहे. याचा फायदा आपत्कालीन स्थितीत होणार आहे. स्विमिंग ग्रुपच्या वतीने येथे नवख्यांना चांगले मार्गदर्शन करण्यात येत आहे.