शाळांमध्ये योग साधनेचे धडे
By admin | Published: June 23, 2016 10:50 PM2016-06-23T22:50:58+5:302016-06-23T23:01:48+5:30
जागतिक योगदिन : शहरातील विविध संस्थांचाही पुढाकार
नाशिक : जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून योगदिन साजरा करण्यात आला.
श्रीरामकृष्ण विद्यानिकेतन
श्रीरामकृष्ण परमहंस विद्यानिकेतन, दत्तनगर, पेठरोड, पंचवटी या शाळेत योग दिवस मुख्याध्यापक भारती शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी योगशिक्षक विलास शेवाळे यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी सहकारी शिक्षक चंद्रटिके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कोकणी, श्रीमती भोसले आदि उपस्थित होते.
न्यू मराठा हायस्कूल
न्यू मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीदेखील योगाचे विविध प्रकार, सूक्ष्म व्यायाम प्रकारांसह विविध आसने व व्यायाम प्रकार घेतले. या प्रकारांत प्रमुख अतिथी सतीश जाधव यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमास पर्यवेक्षक पी. टी. भागवत, एस. एस. संगमनेरे, एम. के. सूर्यवंशी, एस. ए. खरात, बी. डी. गडाख आदि उपस्थित होते.
माधवराव लेले विद्यालय
मुख्याध्यापक व्ही. यू. देशपांडे यांनी योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आव्हाड व सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना विविध आसनांची व प्राणायामांची प्रात्यक्षिके करून दाखविली. ओंकाराने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
चुंचाळे मनपा शाळा क्रमांक १00
चुंचाळे येथील मनपा शाळा क्रमांक १00 येथे योगदिन सकाळ सत्रात वेळेत साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साठे व उपाध्यक्ष कुसुम तळेकर उपस्थित होते. पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी व पालक यांनी विविध आसने केली. योगाची माहिती व महत्त्व जाणून घेतले. या कार्यक्रमात सुलभा शिवदे, राजेंद्र म्हसदे, तुकाराम खेमनर, वैशाली शेवाळे, पवार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
उन्नती विद्यालय
उन्नती माध्यमिक विद्यालयात संस्थाचालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे योग प्रात्यक्षिक शिबिर घेण्यात आले. त्याप्रसंगी योगप्रशिक्षक संजय खैरनार यांनी योगाचे जीवनातील महत्त्व सांगितले. याप्रसंगी सर्वांनी एकत्रितपणे सराव करून यात सहभाग नोंदविला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे, अॅड. प्रवीण अमृतकर, बापूराव शिनकर, सुभाष मुसळे, मुख्याध्यापक सुभाष पिंगळे, रामदास वाणी, नंदलाल धांडे आदि उपस्थित होते.