या भारतात बंधूभाव नित्य वसू दे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:58 PM2020-08-16T22:58:31+5:302020-08-17T00:18:53+5:30
नाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
आर्मस्ट्राँग साखर कारखाना
मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील आर्मस्ट्राँग साखर कारखाना येथे ज्येष्ठ कामगार अरूण अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे पुतळ्यास सर्जेराव निकम यांनी पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुरक्षा अधिकारी संदीप जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला.
वाके ग्रामपंचायत
वाके : ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच श्रीमती भागाबाई बच्छाव यांच्या हस्ते, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे ध्वजारोहन संगिता बच्छाव यांचेहस्ते तर जिल्हा परिषद शाळेत सैन्य दलातील जवान समाधान बच्छाव व मोठाभाऊ बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.
पाटणे सोसायटी
पाटणे : येथे ग्रामपंचायतीत सरपंच राहुलाबाई अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पं. ज. नेहरू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात माजी पंचायत समिती सदस्य दौलत बागुल यांच्या हस्ते तर प्राथमिक शाळेत उपसरपंच जयश्री शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बस स्टॅण्ड येथे रंगनाथ शेवाळे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पाटणे सोसायटीचे ध्वजारोहण संस्थेच्या संचालिका शांताबाई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. श्री संत सावता महाराज चौकातील ध्वजारोहण आरोग्य सेवक अरूण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चौकटपाडे ग्रामपंचायत
चौकटपाडे : येथे ग्रामपंचायतीत माजी सैनिक माणिक पारखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे रवींद्रं गुडघे व प्रदीप पारखे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच अनिरूद्ध पारखे यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुलांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच लोकांना करपट्टी भरण्यासाठी प्रोत्साहित केले.रावसाहेब थोरात विद्यालय, जानोरीजानोरी : येथील कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी होते. प्रास्ताविक प्राचार्य विजय म्हस्के यांनी केले.
ध्वजारोहण माजी सैनिक सर्जेराव देशमुख यांनी केले, तर स्काउट-गाइडचे ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर यांनी केले. यावेळी विलास पाटील, रामराव पाटील, नंदकुमार डिंगोरे, संतोष निकम, रंगनाथ घोलप, सुधा सोमवंशी, डॉ.चंद्रकांत पाटील, शांताराम मौले, जी. एम. गायकवाड, एल. टी. गुरुजी, सायली गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. संगीतशिक्षक दिलीप पागेरे व गीत मंचने राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तिपर गीते सादर केली.
कार्यक्र मास पर्यवेक्षक निर्मला शिंदे, मुख्याध्यापक सोनाली देशमुख, नंदू पाटील, प्रदीप जाधव, अशोक गायकवाड, निवृती आहेर, शिवाजी शिंदे, उत्तम हाडोळे, नितीन जाधव, वसंत पगार, प्रमोद सोनवणे, योगेश मोगल, ज्ञानेश्वर भवर, अविनाश पालवी, मंगेश वाळके, तुषार गिते, नंदू घोटेकर, छाया शिरसाठ, मनीषा पवार, आदी उपस्थित होते.