चला, देश भ्रष्टाचारमुक्त करुया !

By admin | Published: November 15, 2016 12:41 AM2016-11-15T00:41:18+5:302016-11-15T00:40:07+5:30

वडांगळी : अधिकारी, शिक्षक, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा निर्धार

Let the country be free of corruption! | चला, देश भ्रष्टाचारमुक्त करुया !

चला, देश भ्रष्टाचारमुक्त करुया !

Next

सिन्नर : भ्रष्टाचार ही देशाला आणि पर्यायाने समाजाला लागलेली भयंकर कीड असून, या ‘कॅन्सर’ने संपूर्ण व्यवस्था पोखरली आहे. देशाच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा ठरणाऱ्या या भ्रष्टाचारापासून देशाला वाचविण्याची जबाबदारी तरुण पिढीची असून, त्यासाठी त्यांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन इंडिया सिक्युरिटी प्रेसचे निरीक्षक ए. के. गोविल यांनी केले.
केंद्रीय सतर्कता आयोगाच्या वतीने साजऱ्या करण्यात आलेल्या सतर्कता सप्ताहाच्या निमित्ताने इंडिया सिक्युरिटी प्रेसने वडांगळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील ग्रीन व्हीजन कंपनीच्या सभागृहात पंचायत समिती सदस्य रामदास खुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर सरपंच सुनीता सैंद, इंडिया सिक्युरिटी प्रेसचे सहायक प्रबंधक अर्पित धवन, भूषण कुलकर्णी, भरत वाल, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, उत्तम कुलथे, नितीन अढांगळे, किशोर खुळे, पोपट सैंद, ग्रामसेवक शेषराव धीवर आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रीन व्हिजनचे संचालक नितीन अढांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद रत्नाकर यांनी यावेळी बोलताना सतर्कता आयोगाचे बोधचिन्ह ‘बहिर्गोल भिंगाच्या रुपातील उघडा डोळा’ याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, व्यवहार याकडे उघड्या डोळ्यांनी व बारकाईने लक्ष देऊन जागल्याची भूमिका बजवावी, असे आवाहन केले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या साक्षी तिडके (प्रथम), तेजस मवाळ (द्वितीय), काजल चव्हाणके (तृतीय) यांना अनुक्रमे एक हजार पाचशे, एक हजार व आठशे रुपये रोख स्वरुपात देण्यात आले. त्याचबरोबर प्रज्ञा चव्हाणके, शुभांगी कोकाटे, माधुरी खुळे, उत्कर्ष दंडगव्हाळ यांना प्रत्येकी सातशे रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आले. अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना भ्रष्टाचारविरोधी शपथ दिली. भरत वाल यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब कलकत्ते यांनी सूत्रसंचालन केले. सतीमाता संस्थानचे विश्वस्त रमेश खुळे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Let the country be free of corruption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.