होऊन जाऊ द्या ‘शुभमंगल सावधान’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:55+5:302021-07-04T04:10:55+5:30
चौकट- परवानगीसाठी अग्निदिव्य विवाह सोहळा करण्यासाठी संबंधित परिसरातील पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, महापालिका कार्यालय यांच्याकडे अर्ज करून परवानगी घ्यावी ...
चौकट-
परवानगीसाठी अग्निदिव्य
विवाह सोहळा करण्यासाठी संबंधित परिसरातील पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, महापालिका कार्यालय यांच्याकडे अर्ज करून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलीस आयुक्त कार्यालयाच्या एक खिडकी विभागात जमा करावे लागते. तेथून परवानगी मिळाल्यानंतर वधू किंवा वरपिता निश्चिंत होतात. या संपूर्ण प्रक्रियेस किमान ८ ते १० दिवसांचा कालावधी जातो. यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जाते.
चौकट-
या असतील अटी
विवाह सोहळ्यास केवळ ५० माणसांची उपस्थिती राहील. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सर्व विधी उरकावयाचे आहेत. वराची मिरवणूक काढण्यास बंदी असून जर मिरवणूक काढली तर वधू-वर पित्यास दंड आकारला जातो. वाद्य वाजविता येणार नाही. विवाहस्थळी उपस्थित सर्व वऱ्हाडींनी मास्क वापरणे बंधनकारक. त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर आवश्यक. अशा वेगवेगळ्या अटींच्या अधीन राहून विवाहसोहळ्यांना परवानगी दिली जाते.
चौकट-
शुभमुहूर्त
जुलैमध्ये विवाह सोहळ्यांसाठी १३ जुलैपर्यंत मुहूर्त असून, या महिन्यात एकूण चार शुभमुहूर्त आहेत. आता केवळ १३ जुलैचा मुहूर्त शिल्लक आहे. पहिले तीन मुहूर्त १ ते ३ जुलैदरम्यान होते. मागील महिन्यात सहा विवाह मुहूर्त होते.
चौकट-
वधू-वर पित्याची कसरत
कोट-
मुलीचा विवाह सोहळा उरकण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या गोळा करताना खूपच फिरफिर करावी लागली. पण, एकदाच्या परवानग्या मिळाल्या. अटी-शर्तींचे पालन करताना नाकीनऊ आले. आलेले पाहुणे सांभाळत एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची वेळोवेळी काळजी घ्यावी लागली.
- रमेश अहिरे, वधुपिता
कोट-
शहरी भागात विवाह सोहळा करताना घ्याव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्यांपेक्षा शहराच्या बाहेर जाऊन किंवा गावाकडे जाऊन मुलाचा विवाह उरकणे सोयीचे वाटले. विवाह सोहळ्यांना निर्बंध सर्वत्र असले तरी शहरी भागात परवानग्या मिळविताना खूपच त्रास होतो.
- प्रभाकर जाधव, वरपिता