कोविड सेंटर सुरू होऊ दे रे महाराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:20 PM2020-07-18T20:20:52+5:302020-07-18T20:28:04+5:30

कोविड सेंटर सुरू होऊ दे रे महाराजा, सरकारला सद््बुद्धी दे रे महाराजा...ठक्करडोम येथील नियोजित कोविड सेंटरमध्ये अशी आळवणी करीत महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले आणि शासन तसेच जिल्हा प्रशासनाला साकडे घालण्यात आले.

Let the Kovid Center begin, O Maharaja | कोविड सेंटर सुरू होऊ दे रे महाराजा

कोविड सेंटर सुरू होऊ दे रे महाराजा

Next
ठळक मुद्देमनसेचा नवसठक्कर डोममध्ये अभिनव आंदोलन

नाशिक : कोविड सेंटर सुरू होऊ दे रे महाराजा, सरकारला सद््बुद्धी दे रे महाराजा...ठक्करडोम येथील नियोजित कोविड सेंटरमध्ये अशी आळवणी करीत महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले आणि शासन तसेच जिल्हा प्रशासनाला साकडे घालण्यात आले.
सध्या नाशिकमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना त्र्यंबकरोडवरील हे कोविड सेंटर केवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद््घाटन करण्यासाठी अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरातील बाधिताना आडगावजवळ दाखल करावे लागत असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, ती आता पाच हजारांवर गेली आहे. परंतु कोरोनाबाधितांना रुग्णालयात जागा नसल्याचे सांगितले जात आहे. शहरात ठक्कर डोम येथे महापालिकेने महिनाभरापूर्वीच सुसज्ज सेंटर तयार केले. मात्र, त्याचा वापर सुरू झालेला नाही. मध्यंतरी पावसाळा होता असे कारण दिले गेले आणि नंतर मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाच्या या वेळखाऊ धोरणामुळे रुग्णांचे मात्र हाल होत असून, आडगाव येथे त्यांना शहरापासून दूर दाखल करावे लागत आहे. त्यामुळे आता शहरातील गोरगरीब रुग्णांसाठी हे सेंटर खुले करावे यासाठी मनसेच्या वतीने शनिवारी (दि.१८) हे आंदोलन करण्यात आले. कोविड सेंटरमध्ये आरती करून देवाला साकडे घालण्यात आले आणि नवसपूर्ती झाल्यानंतर आवश्यक तो नैवेद्य देण्यात येईल असे देवताना सांगण्यात आले. आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाप्रमुख मनोज घोडके, विजय आगळे, जावेद खान, अक्षय खोडदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Let the Kovid Center begin, O Maharaja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.