होऊ आम्ही नीतिवंत.. कलागुणी बुद्धिवंत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 09:31 PM2020-06-20T21:31:18+5:302020-06-20T21:34:13+5:30
वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो.
हे बोलके चित्र आहे मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी गावातील आदर्श शेतकरी म्हणून परिचित असलेल्या सुरेश शिवाजी ठाकरे यांच्या घरचे. भूमिकन्या डॉ. जयश्री ठाकरे यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. या निकालाने तालुक्याला सुखद धक्का दिला आहे.डॉ. जयश्री या ओबीसी संवर्गातून राज्यातून मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. जयश्रीने प्राथमिक शिक्षण अंबासनच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून केल्यानंतर आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर नवोदय परीक्षा पास करत माध्यमिक शिक्षण दिंडोरी(नाशिक) येथील नवोदय विद्यालयात पूर्ण केले आहे. तर पुढील वैद्यकीय शिक्षण बीएएमएस सावंतवाडी जि. रत्नागिरी येथे पूर्ण केले. याआधी 2017 मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. यामध्येच ही नवी आनंदाची बातमी मिळाली आहे.
सिन्नर : विडी वळण्याचे काम करणारी आई आणि शेती करणारे वडील, आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची, शिवाय दुष्काळ पाचवीला पुजलेला. अशा बिकट परिस्थितीतून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढत जिद्द, चिकाटी आणि अभ्यास या त्रिसुत्रीचा अवलंब करत तालुक्यातील पाटोळे गावचा गणेश तुकाराम खताळे याने उपजिल्हाधिकारी पदावर यशाची मोहर उमटवली आहे.
पाटोळे गावासह तालुक्याच्या नावलौकीकात मानाचा तुरा खोवला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत त्यांनी 17 वे स्थान पटकाविले असून इतर मागास प्रवर्गात ते राज्यात दुसर्या
क्र मांकाने उत्तीर्ण झाला आहे. गणेश यांनी आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही अहोरात्र कष्ट उपसत उच्च दर्जाचे शिक्षण घेतले. गणेशचे प्राथमिक शिक्षण पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयात तर बारावी सायन्स पर्यंतचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात झाले. त्यानंतर नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरींगची पदवी संपादन केली. त्यानंतर रेंज फॉरेस्ट आॅफिसर, 2017 साली कक्ष अधिकारी पदावर यश संपादन केले. सध्या ते मंत्रालयात कक्ष अधिकारी असतानाही हे यश मिळविले आहे.