शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:42 PM2020-01-20T22:42:45+5:302020-01-21T00:18:12+5:30
आम्हाला शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चिंतामुक्त करायचे आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन चालू आहे. शेतकºयांची दु:खे कायमची दूर व्हावीत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. या कामास कदाचित वेळ लागेल; परंतु आपण यात नक्कीच यशस्वी होऊ, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादाभुसे यांनी केले.
मालेगाव : आम्हाला शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चिंतामुक्त करायचे आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन चालू आहे. शेतकºयांची दु:खे कायमची दूर व्हावीत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. या कामास कदाचित वेळ लागेल; परंतु आपण यात नक्कीच यशस्वी होऊ, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
मालेगाव शहर व तालुक्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांतर्फे कृषिमंत्री आमदार दादा भुसे यांचा रविवारी ज्येष्ठ नागरिक सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी बी.के. नागपुरे होते.
निंबा सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मालेगाव ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी. आर. हिरे, सौंदाणे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे एस. एस. देवरे, स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संस्था सोयगावचे अध्यक्ष पी.बी. कुलकर्णी, खडकी, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे हरी सावंत, पाटणे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे हरिदास आहिरे, झोडगे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे गुलाबराव देसले, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संस्था सायन्याचे काळू सावंत, तालुका पेन्शनर संघटनेचे वाय. जी. अहिरराव, विनायक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रभाकर वारुळे, कौळाणचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जगन्नाथ बच्छाव, पुरुषोत्तम ठाकूर, जलसेवा कर्मचारी संघटनेचे पिंजन, बुवा दादा शिक्षण संस्थेचे व्ही.आर. पाटील, आश्रय संस्थेचे श्यामकांत पाटील, मालेगाव महानगरपालिका पेन्शनर शिक्षक संघटनेचे वाय. व्ही. वाघ आदींनी भुसे यांचा सत्कार केला. प्रा. पद्मा वाव्हळ, शालिनी डहाळे, नलिनी माळी, रोहिदास, कमलाकर चौधरी, दत्तात्रय परचुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान बागुल यांनी केले. सुखदेव देवरे यांनी आभार मानले.
भुसे म्हणाले, कृषी विभाग हा खूप मोठा विभाग आहे. या विभागाच्या योजना इतर विभागांवर अवलंबून आहेत. राज्यात कधी जास्त तर कधी कमी पाऊस पडतो, कधी गारपीट होते, कधी पिकांवर रोगराई येते. अशा विविध कारणांनी राज्यातील शेतकरी दुष्टचक्र ात अडकतो. या सर्व प्रश्नांवर मात करण्यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधावा लागतो. कृषी विद्यापीठातील संशोधकांनी शेतकरी हितासाठी केलेले संशोधन शेतकºयांपर्यंत जावे म्हणून आपण सूचना दिल्या आहेत.