...चला साजरा करूया हजारो झाडांचा ‘बर्थ-डे’

By admin | Published: May 28, 2017 01:42 AM2017-05-28T01:42:13+5:302017-05-28T01:42:29+5:30

नाशिक : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्यानुसार प्रत्यक्ष कृतीतून वनमहोत्सव आयोजित केला होता.

... Let's celebrate the birth-day of thousands of trees. | ...चला साजरा करूया हजारो झाडांचा ‘बर्थ-डे’

...चला साजरा करूया हजारो झाडांचा ‘बर्थ-डे’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्यानुसार प्रत्यक्ष कृतीतून दोन वर्षांपूर्वी वनविभागाच्या जागेत आपलं पर्यावरण संस्थेने वनमहोत्सव आयोजित केला होता. यावेळी हजारो हातांनी एकत्र येऊन दिवसभरात सुमारे अकरा हजार रोपांची लागवड केली होती. लावलेली झाडे जगविण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, या उद्देशाने येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर येथील शंभर प्रजातींच्या हजारो झाडांचा ‘बर्थ-डे’ साजरा करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.
सातपूरजवळील फाशीचा डोंगर आता ‘नाशिक देवराई’ बनला आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या हजारो पर्यावरणपूरक झाडांची झालेली दमदार वाढ त्याचे उदाहरण आहे. येत्या ५ जूनला देवराईवरील रोपटे दोन वर्षांचे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने संस्थेने नाशिककरांनी लावलेल्या रोपट्यांचा ‘बर्थ-डे’ साजरा करण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे.
येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील आपलं पर्यावरण संस्थेने म्हसरूळजवळील वन कक्षाच्या जागेत सुमारे साडेपाच हजार रोपांची लागवड करत पर्यावरण दिन साजरा केला होता. या दोन्ही ठिकाणांच्या रोपट्यांच्या संवर्धनाची पूर्णपणे जबाबदारी या संस्थेने सलग तीन वर्षांसाठी स्वीकारली आहे. लोकसहभागातून यशस्वी होणाऱ्या या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन नागरिकांनी पर्यावरणपूरक जागृती दाखवावी, हा झाडांचा वाढदिवस साजरा करण्यामागचा संस्थेचा हेतू आहे. यंदा मोठ्या संख्येने रोपट्यांची लागवड ओसाड जागेवर न करता या संस्थेने देवराईवर सर्व नाशिककरांना त्यांनी लावलेल्या रोपांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोशल मीडियावरून निमंत्रित केले आहे. पर्यावरण दिनाच्या औचित्यावर येथे येऊन झाडांना पाच लिटर पाण्याने भरलेला कॅन ‘गिफ्ट’ करण्याचे आवाहन व्हायरल झालेल्या पोस्टमधून करण्यात आले आहे. लोकांमध्ये झाडांविषयी आणि जैवविविधतेविषयी जनजागृती व्हावी आणि वृक्ष जगविण्याची जिद्द वाढावी हा यामागील उद्देश असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: ... Let's celebrate the birth-day of thousands of trees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.