एकला चालो रे...

By admin | Published: October 29, 2015 12:08 AM2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:08:11+5:30

टागोरांच्या विविध रचनांचे सुमधुर गायन

Let's go alone | एकला चालो रे...

एकला चालो रे...

Next

नाशिक : बंगाली भाषेत कवीवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेले मॉ ने रॉबे..., शुखे अमाय..., एकला चालो रे... अशा एकापेक्षा एक सरस गीतांचे त्यांच्याच चालीमध्ये सादरीकरण क रून गायक राधा मंगेशकर यांनी ‘रवींद्र संगीत’चे विविध पैलू उलगडले.
निमित्त होते, गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामध्ये बाबाज् थिएटर व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रवींद्र संगीत’ मैफलीचे!
बंगाली भाषेत टागोर यांनी संगीतबद्ध केलेली सुमारे वीस हजार २३० गीते असून त्यांचे संगीत आजदेखील जैसे थे आहे. कारण विश्वभारती शांतिनिकेतन संस्थेमार्फत गायकांना आहे त्याच चालीमध्ये ‘रवींद्र संगीत’ सादर करण्याचा कडक नियम घालून देण्यात आला आहे. त्यामुळे हे संगीत सुरक्षित राहण्यास मोलाची मदत झाल्याचे मत मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक गायकासाठी रवींद्र संगीताचे गायन करणे ही अभिमानाची बाब असते, हा मान मला मिळाल्याबद्दल मी अतिशय आनंदात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आयतोबे..., तुमी मोर..., मॉधू गॉन्धे, रोई भालो..., तोमार होलो शुरू..., तुमी रॉबे..., हे खोनीकेर... या गीतांचेही सुमधुर गायन केले. त्यांना डॉ. राजेंद्र दटकर (तबला), विशाल (तालवाद्य), विवेक परांजपे (सिंथेसायजर) यांनी साथसंगत केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Let's go alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.