...जाणून घेऊया पावसाचे गणित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 05:17 PM2019-07-30T17:17:34+5:302019-07-30T17:23:16+5:30

जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरूवात झाली की दरवर्षी पावसाळ्यात‘क्युसेक’, मिमी, टीएमसी, एमसीएफटी असे शब्द वाचायला किंवा ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळही उडतो तर काहींना त्याचे कुतुहलही वाटते.

... let's learn the math of rain! | ...जाणून घेऊया पावसाचे गणित !

...जाणून घेऊया पावसाचे गणित !

Next
ठळक मुद्देआळंदी धरणातून २४३क्युसेक पाणी सोडण्यात होळकर पुलाखालून पुढे १२ हजार ३०० क्युसेक पाणी नदीपात्रातून वाहत आहे.

अझहर शेख, नाशिक : जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरूवात झाली की दरवर्षी पावसाळ्यात‘क्युसेक’, मिमी, टीएमसी, एमसीएफटी असे शब्द वाचायला किंवा ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळही उडतो तर काहींना त्याचे कुतुहलही वाटते. खरे तर हे गणितामधील पाऊसपाणी मोजण्याचे परिमाणाचे सामन्यज्ञान आहे; मात्र या शब्दांचा दैनंदिन जीवनात फारसा संबंध येत नसल्यामुळे त्यांचा अर्थ अनेकदा विस्मरणात जातो. पावसाचे गणित नेमके काय असते, याबाबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
२५.४ मि.मी : १इंच
१ घनफूट म्हणजे २८.३१ लिटर्स पाणी
१ एमसीएफटी : १ दशलक्ष घनफूट (१० लाख घनफूट पाणी)
१ टीएमसी पाणी = १,००० दशलक्ष घनफूट (१ अब्ज घनफूट पाणी)
१ घनफूट प्रति सेकंद म्हणजे १ क्युब प्रति सेकंद असा होतो.
१घनफूट पाणी म्हणजे २८.३१ लिटर्स पाणी होय.

धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये मोजला जातो. तसेच पाण्याचा विसर्ग क्युसेकमध्ये मोजला जातो. धरणातून पाणी सोडताना त्याचे परिमाण क्युसेकमध्ये मोजले जाते. जेव्हा गंगापूर धरणातून १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो तेव्हा गोदापात्रात (१,०००ला २८.३१ ने गुणने) २८ हजार ३१० लिटर्स इतके पाणी प्रति सेकंदाला प्रवाहित होते.
धरणातून जेव्हा २४ तासांत सातत्याने ११ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला तर त्या धरणाचा जलसाठा २४ तासानंतर १टीएमसी अर्थात १ हजार दशलक्ष घनफूटाने कमी होईल.
५ हजार ६४०दशलक्ष घनफूट अर्थात साडेपाच टीएमसी इतकी साठवण क्षमता गंगापूर धरणाची आहे. धरणाचा जलसाठा सध्या ४ हजार ७५८ दशलक्ष घनफूट इतका झाला असून ८४.५ टक्के धरण भरले आहे. सध्या गोदावरीमध्ये गंगापूर धरणातून ८ हजार ८३३ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. २५ कोटी ६२ हजार २३०लिटर्स इतके पाणी प्रतिसेंकदाला गोदावरीत प्रवाहित होत आहे. आळंदी धरणातून २४३क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या होळकर पुलाखालून पुढे १२ हजार ३०० क्युसेक पाणी नदीपात्रातून वाहत आहे.

 

Web Title: ... let's learn the math of rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.