कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:37 PM2020-05-30T22:37:53+5:302020-05-30T23:55:54+5:30
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
देवळा : तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
कांदा उत्पादक संघटनेने सुरू केलेल्या या उपक्रमास कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. देवळा तालुक्यातील शेकडो कांदा उत्पादक शेतकºयांची पत्रे देवळा येथील पोस्ट कार्यालयातून रवाना झाली आहेत. त्यात विठेवाडी, खर्डे, सटवाईवाडी, देवळा, मटाणे, लोहोणेर, गुंजाळनगर आदी गावांतील शेतकºयांचा सहभाग आहे. पत्र पाठविताना शारीरिक अंतर पाळण्यात आले. यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे प्रांतिक संपर्कप्रमुख कुबेर जाधव, राज्य संघटक कृष्णा जाधव, कांदा उत्पादक शेतकरी नानाजी आहेर, बापू देवरे, दशरथ पूरकर, विनोद आहेर, हितेंद्र आहेर, संकेत जाधव, भाऊसाहेब मोरे, किशोर आहेर, दीपक आहेर, पंकज आहेर, जिंतेद्र आहेर, दीपक गुंजाळ, शशिकात पवार, संदीप पवार आदी उपस्थित होते.
शहरी भागातील ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकल्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. आता कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतरही कांद्याच्या बाजारभावात फरक पडलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय द्यावा, यासाठी पत्रप्रपंच केला आहे.
- दशरथ पूरकर,
कांदा उत्पादक, मांजरवाडी
चालूवर्षी सर्वच शेतमालाला कोरोनाचा फटका बसून शेती तोट्यात गेली. शेतकºयांची शेवटची आशा आता कांद्यावर आहे. कांद्याची शेतीही शाश्वत शेती होऊ शकते, हा विश्वास शेतकºयांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता असून, यासाठी केंद्र सरकारने शेतकºयांना दिलासा मिळेल, असे निर्णय घेण्याची गरज आहे.
- नानाजी आहेर,
कांदा उत्पादक, देवळा