राज ठाकरे यांचे शाळांना सुरक्षेसाठी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:04 AM2017-09-22T00:04:20+5:302017-09-22T00:15:54+5:30

देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर होणाºया लैंगिक अत्याचार व हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील विविध शाळांना पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याची व आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करण्याचे आवाहन केले आहे.

Letter for security for Raj Thackeray's schools | राज ठाकरे यांचे शाळांना सुरक्षेसाठी पत्र

राज ठाकरे यांचे शाळांना सुरक्षेसाठी पत्र

Next

नाशिक : देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर होणाºया लैंगिक अत्याचार व हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील विविध शाळांना पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याची व आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करण्याचे आवाहन केले आहे.
शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच प्रवासात शाळकरी मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही समाजासाठी घातक असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली. दिल्लीतील एका शाळेत शाळकरी मुलाच्या हत्येनंतर राज ठाकरे यांनी मुंबईतील काही शाळांना पत्राद्वारे विद्यार्थी सुरक्षेविषयी आव्हान केले होते. त्या पार्श्वभूमीवर मनविसेच्या पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी नाशिक शहरातील रेयान इंटर नॅशनल स्कूलसह अशोका, सेंट फ्रान्सिस, पोद्दार आदी शाळा-महाविद्यालांमध्ये संचालक तथा मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांचे पत्र देऊन विद्यार्थी सुरक्षेसाठी दक्ष राहण्याचे आवाहन केले.

Web Title: Letter for security for Raj Thackeray's schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.