लेटलतीफांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Published: November 22, 2015 10:30 PM2015-11-22T22:30:48+5:302015-11-22T22:31:40+5:30

मालेगाव : तहसीलदारांकडून हजेरी बुकाची तपासणी

Lettuce Show Cause Show | लेटलतीफांना कारणे दाखवा नोटीस

लेटलतीफांना कारणे दाखवा नोटीस

Next

मालेगाव : येथील तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार सुरेश कोळी यांनी हजेरी बुकाची तपासणी करून गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.
नवीन तहसीलदार सुरेश कोळी यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी
विना परवानगी मुख्यालय न सोडण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी तहसीलदार कोळी यांनी सकाळी साडेदहा वाजता हजेरी बुकाची तपासणी केली असता पाच कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याचे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. येथील तहसील कार्यालयात गेल्या तीन ते चार वर्षापासून आवो जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जण कार्यालयीन वेळेत गावाला किंवा खासगी कामाला परस्पर निघून जात असून, कोणी विचारणा केली तर रजेवर असल्याचे मोबाइलवर सांगीतले जात होते. याला जबाबदार येथील तत्कालीन तहसीलदार होते. ते स्वत: एक ते दीड वर्षापासून नियमित गैरहजर राहत होते. दिवसातील एक ते दीड तास ते कार्यालयात आले तर येत, नाहीतर दिवसभर ते फिरकतही नसत. त्यांची कार्यालयीन वेळ सायंकाळी सहानंतर सुरू होत होती. यामुळे कर्मचाऱ्यांंमध्ये वचक राहिला नव्हता. सर्व कामकाज थांबले होते. यासाठी भाजपाने आंदोलनही केले होते. हे अंगवळणी पडलेल्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार कोळी यांच्या शिस्तीच्या वागण्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Lettuce Show Cause Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.