मोहिते महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:38 PM2020-08-12T22:38:12+5:302020-08-13T00:06:47+5:30

देवगाव : भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी खोडाळा-जोगलवाडी महाविद्यालयात राष्टÑीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृद्धिंगत व्हावी यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

Librarian Day celebrated at Mohite College | मोहिते महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

खोडाळा-जोलवाडी शाळेत राष्टÑीय ग्रंथपाल दिनानिमित्त डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करताना प्र्राचार्य प्रा. यशवंत शिद. सोबत ग्रंथपाल प्रा. तुकाराम रोकडे.

Next
ठळक मुद्देग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्त्वाचा घटक

लोकमत न्यूज नेटवर्क
देवगाव : भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी खोडाळा-जोगलवाडी महाविद्यालयात राष्टÑीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृद्धिंगत व्हावी यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून, समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्त्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे वाचकांच्या गरजा वाढतात, बदलतात त्याचप्रमाणे ग्रंथपालनाच्या कक्षाही वाढत जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.तुकाराम रोकडे यांनी केले. यावेळी गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव प्रा. दीपक कडलग, प्राचार्य प्रा. वाय. जे. शिद, प्राचार्य प्रा. प्रवर्तन काशीद, प्रा.नवनाथ शिंगवे, शिवाजी शिंदे, राहुल नागवंशी, सिद्धार्थ मोहिते, मधुकर पाटील, दौलत बागुल, सुनील सोनवणे, जयराम मौळे आदी उपस्थित होते.ग्रंथालयशास्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. ग्रंथालयांच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार रुजवला. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले.

Web Title: Librarian Day celebrated at Mohite College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.