‘इस्पॅलियर’मध्ये १८० फूट लांबीच्या रेल्वेत साकारले ग्रंथालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:32 AM2018-11-13T00:32:49+5:302018-11-13T00:33:21+5:30
लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून, रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी आहे. यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फूट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला आहे.
नाशिक : लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून, रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी आहे. यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फूट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला आहे.
शाळेचे प्रमुख सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून ही रेल्वे लायब्ररी तयार करण्यात आली असून या रेल्वेचे डिझाईन यतिन पंडित यांनी केले आहे. शाम लोंढे यांनीही डिझाईन आणि निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले. टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून ही रेल्वे लायब्ररी तयार करताना जुन्या लोखंंडाचा वापर करण्यात आला आहे. या ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते झाले. यावेळी नंदलाल काळे, डॉ. प्राजक्ता जोशी, कुमुदिनी बंगेरा उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात अभ्यास करता यावा आणि वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी लायब्ररीची निर्मिती करण्यात आल्याचे सचिन जोशी यांनी सांगितले. या रेल्वे लायब्ररीला ‘मोहन टू महात्मा’ असे नाव देण्यात आले आहे.
‘लिम्का बुक’मध्ये नोंद करण्याचा प्रयत्न
रेल्वेतील ग्रंथालयाची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. जपानमध्ये रेल्वेच्या डब्यांमध्ये भरणाºया शाळेविषयी वाचले होते. त्यानंतर रेल्वेच्या डब्यामध्ये लहान मुलांच्या पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करण्याचा विचार आला आणि विंटेज रेल्वेतील ग्रंथालय शाळतील सर्वांच्या प्रयत्नाने उभे राहिल्याचे सचिन जोशी यांनी सांगितले.