ग्रंथालय सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 04:44 PM2019-11-27T16:44:14+5:302019-11-27T16:45:21+5:30
सिन्नर : डफ, ढोलकी, संबळच्या निनादात शिवकाल उभा करणाऱ्या उत्साहवर्धक पोवाड्यांनी सिन्नर ग्रंथालय सप्ताहाची सांगता झाली.
सिन्नर : डफ, ढोलकी, संबळच्या निनादात शिवकाल उभा करणाऱ्या उत्साहवर्धक पोवाड्यांनी सिन्नर ग्रंथालय सप्ताहाची सांगता झाली.
शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांनी आपल्या पहाडी आवाजातील कवनांनी सुमारे दोन तासाहून अधिकवेळ श्रोत्यांना खिळवून ठेवले. वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक पी. एल. देशपांडे यांनी त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष लक्ष्मण नानाजी देशपांडे यांच्या स्मृतिप्रीतर्थ हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.
काळ्या आईची करीतो सेवा, साºया जगाचा पोशिंदा, नाही केला माझ्या मातीचा कधीच मी धंदा असे बळीराजाचे वर्णन करताना शाहिरांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी कळकळीचे आवाहन करत प्रबोधन केले.
शिवरायांनी स्वराज्यस्थापनेसाठी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली केलेली वाटचाल त्यांनी कवनातून सांगितली. बालशिवाजी नाव ठेवता, राजे शहाजी शोभता पिता, माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळा जो जो रे जो! असा पाळणाही शाहीर डुंबरे यांनी गोड आवाजात सादर केला.
पहाडी तेवढाच गोड आवाज, हृदयाला हात घालणारी प्रसंग डोळ्यांपुढे उभी करणारी कवने आणि त्याला साजेशा आवेशात डफ वाजवत डुंबरे यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. विशाल, अक्षय व विक्रम नन्नावरे या गायक बंधूंनी त्यांना साथ दिली. नीलेश तेल्हुरे (ढोलकी), आकाश बैराजी (चंडा), विजय बाकळे (आॅर्गन), शुभम यादव (संवादिनी), रोशन भिसे (संबळ) या वाद्य वाजविणाºया सहकाºयांनी तेवढ्याच तन्मयतेने पोवाड्यास साथसंगत केल्याने उपस्थित असलेले श्रोते भारावून गेले.
-