परवान्याची शिफारस देणारेच करणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:39 PM2017-08-18T18:39:32+5:302017-08-18T18:39:52+5:30
नाशिक : परवानगी खते व बि-बियाणे विक्रीची घेतलेली असताना चक्क त्या जागी मद्यविक्री सुरू असल्याचे प्रकरण घोटीत उघडकीस आल्यानंतर आता कृषी विभागाने याप्रकरणी सारवा-सारव सुरू केली आहे. ज्यांच्या अहवालातील शिफारशीनुसार या दुकानाचा परवाना दिला गेला, त्यांनाच या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी यांनी दिल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती नयना रमेश गावीत यांच्याच इगतपुरी तालुक्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन दिवस उलटूनही त्या आता याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.